प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत ईपीएफ लाभ मिळवा (गोवा)

गोवा, दि. ११ मे २०२०: कोविड-१९ विरुद्धच्या लढ्यात गोव्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे प्रादेशिक कार्यालय, दाव्यांचा निपटारा व निवृत्तीवेतन सेवा काळजीपूर्वक आणि किमान कर्मचाऱ्यांसह निवृत्तीवेतनधारकांपर्यंत पोहोचविण्यास वचनबद्ध आहे.

आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या नियोक्त्यांना अग्रगामी लाभ देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (पीएमजीकेवाय) सुरू केली आहे. ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायदा, १९५२ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या आणि जिथे कार्यरत कर्मचार्‍यांची एकूण संख्या शंभर पर्यंत असून त्यातील ९०% किंवा अधिक कर्मचार्‍यांना मासिक वेतन रु. १५०००/- पेक्षा कमी आहे अशा आस्थापना किंवा कारखान्यांसाठी लागू आहे.

केंद्र सरकार या योजनेनुसार अशा आस्थापनांतील मार्च, एप्रिल आणि मे २०२० या वेतन महिन्यांसाठी देय असलेले दोघांचेही ईपीएफ अंशदान (१२% नियोक्ते तसेच १२% कर्मचारी) देईल.

तथापि, प्रथमदर्शनी असे आढळून आले आहे की गोव्यामध्ये १७०२ आस्थापना या लाभासाठी पात्र ठरल्या आहेत, परंतू आत्तापर्यंत फक्त ४२५ आस्थापनांनी ५७४८ कर्मचाऱ्यांसाठी एक कोटी रुपयांपर्यंतचा लाभ घेतला आहे.

मार्च आणि एप्रिल २०२० महिन्यांचा लाभ घेण्यासाठी शेवटची तारीख १५/५/२०२० आहे. कोणताही दंड आकारला जाणार नाही आणि आस्थापने इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न (ईसीआर) अपलोड करू शकतात (प्रशासकीय शुल्क आणि कर्मचारी ठेव संलग्न विमा योजना (ईडीएलआय) असे मिळून फक्त १%आकारण्यात येईल).

याविषयीचा तपशील www.epfindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

गोव्यातील सर्व आस्थापनांना विनंती आहे की, त्यांनी युनिफाइड पोर्टलवर लॉग इन करुन त्वरित लाभ घ्यावा. तसेच डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (डीएससी) सारख्या अडचणी उद्भवणार्‍या आस्थापना नियोक्ता पोर्टलवर लॉग इन करू शकतात आणि आधीपासूनच अधिकृत स्वाक्षर्‍या नोंदणीसाठी लिंकद्वारे ई-साइन नोंदणी करू शकतात. अधिकारी, डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मंजूरीसाठी ईमेलद्वारे स्वीकारतील.

कोणतीही अडचण आल्यास, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयाशी खालील ईमेलआयडीवर संपर्क साधू शकता.

ro.goa@epfindia.gov.in, epforogoa@facebook.com                                                      ट्विटर @epfogoa आणि संपर्क क्रमांक ०८८२-२४३८९०३/९०५/९०१

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा