२ तासांत लग्न उरका! अन्यथा ५० हजार दंड, केवळ २५ लोकांची उपस्थिती

मुंबई, २२ एप्रिल २०२१: कोव्हिड १९चा राज्यभर झपाट्याने फैलाव होत आहे. राज्य शासन देखील अनेक निर्बंध लादून यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने राज्यात मिनी लॉक डाऊन जारी केले होते. मात्र तरीही राज्यातील परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही. परिणामी राज्य सरकारने आज पासून पुन्हा नवीन निर्बंध लादले आहेत. यावेळी लग्नसमारंभात व्यक्तींच्या उपस्थितीबाबत निर्बंध तर लादण्यात आलेच आहेत मात्र यावेळी कितीवेळ लग्न समारंभ असावा यावर देखील निर्बंध लादण्यात आले आहेत.

केवळ २५ लोकांना असणार परवानगी

यापूर्वी लग्न समारंभासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली होती. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ती १०० वर नेण्यात आली होती. आता मात्र अवघ्या २५ लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दंड देखील आकारण्यात येणार आहे.

२ तासांत लग्न उरका!

आजपासून राज्यात नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. यात लग्नसमारंभात लोकांच्या उपस्थितीत बाबतीतच नव्हे तर वेळेबाबत देखील निर्बंध लावण्यात आली आहे. अवघ्या २ तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम उरकावा लागणार आहे. या नियमांचं पालन झालं नाही तर तुम्हाला तब्बल ५० हजार रुपयांचटा दंड ठोठावला जाईल, असं या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा