गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सची eBlu Fio इलेक्ट्रिक स्कूटर लाँच

मुंबई, २३ ऑगस्ट २०२३ : आजकाल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ आहे. पेट्रोलच्या नियमित वाढणाऱ्या भावांमुळे मध्यमवर्गीयांना इलेक्ट्रिक गाड्या घेणे सध्या परवडते. दरम्यान दीर्घ प्रतीक्षेनंतर, गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने अखेरीस पहिली इलेक्ट्रिक स्कूटर eblu Feo लॉन्च केली आहे. ही स्कूटर फुल चार्ज केल्यावर ११० किमी धावेल असा कंपनीचा दावा आहे. .

Eblu Feo फीचर्स-
गोदावरी Eblu Feo मध्ये २.५२ kW लिथियम आयन बॅटरी आहे जी ११० Nm टॉर्क जनरेट करते. स्कूटर एकदा चार्ज केल्यावर ती ११० किमीची रेंज देऊ शकते. ही दुचाकी रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीमने सुसज्ज आहे. यात अनेक राईड मोड्स देण्यात आले आहेत. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कन्‍वीनिएंस बॉक्स, मोबाइल चार्जिंग पॉइंट, ७.४ इंच डिजिटल फुल कलर डिस्प्ले, नेव्हिगेशन असिस्टंट, इनकमिंग मेसेज अलर्ट, कॉल अलर्ट, मोड्स डिस्प्ले, रिव्हर्स इंडिकेटर, बॅटरी SOC इंडिकेटर, थ्रॉटल फॉल्ट सेन्सर, मोटर फॉल्ट सेन्सर इतर सुविधा आहेत. महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये बॅटरी अलर्ट आणि हेल्मेट इंडिकेटर यांचा समावेश आहे.

Eblu Feo डिझाइन-
AHO LED हेडलॅम्प, LED टेल लॅम्प, १२ इंच, ट्यूबलेस टायर आणि १७० ग्राउंड क्लिअरन्स आहे. गोदावरी Eblu Feo मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, ड्युअल ट्यूब ट्विन शॉकर्स, समोर आणि मागील बाजूस CBS डिस्क ब्रेक, साइड स्टँड सेन्सर इंडिकेटरने सुसज्ज आहे.

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स ने ही स्कुटर सिंगल व्हेरिएंटमध्ये सादर केली आहे. तिची एक्स-शोरूम किंमत ९९,९९९ आहे. कंपनीने १५ ऑगस्टपासून इलेक्ट्रिक स्कूटरची प्री-बुकिंग सुरू केली होती. तिची डिलिव्हरी आजपासून सुरू होणार आहे, कंपनीने या स्कूटरवर ३ वर्षे किंवा ३० हजार किमीची वॉरंटी दिली आहे.

बॅटरी, रेंज आणि टॉप स्पीड-
स्कूटरला पॉवर देण्यासाठी रिअर व्हीलमध्ये इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ती ११० nm टॉर्क जनरेट करते. स्कूटरची टॉप स्पीड ताशी ६० किमी आहे. स्कूटरला तीन ड्रायव्हिंग मोड आहेत इकॉनॉमी, नॉर्मल आणि पॉवर. स्कूटरमध्ये रिजनरेटिव्ह सिस्टीम देण्यात आली आहे, ती बॅटरीवरील दाब कमी करते आणि रेंज वाढवण्यास मदत करते.

कंपनीच्या दाव्यानुसार, ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल चार्ज झाल्यावर ११०Km ची रेंज देईल. यासह, ६०V क्षमतेचा होम चार्जर उपलब्ध आहे, जो ५.२५ तासांत स्कूटर पूर्णपणे चार्ज करू शकतो. भारतीय बाजारपेठेत ही स्कूटर Ola S1 Air आणि Ather 450S शी स्पर्धा करेल

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा