मुंबई, २३ सप्टेंबर २०२२ : राज्यात एकीकडे शिवसेना विरुद्ध शिंदे गट आणि शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगताना दिसत आहे. तर आता शिवसेना विरुद्ध मनसे असा कलगीतुरा सुरू झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी, मुंबई झालेल्या गट नेत्यांच्या मेळाव्यात बोलताना शिंदे फडणवीस सरकार तोंडसुख घेताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुन्नाभाई असा उल्लेख करत खोचक टोला लगावला होता.
तसेच मुंबईत झालेल्या गटनेत्यांच्या मेळाव्यात, आता पुढच्या आठवड्यात कदाचित पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. मुंबई पालिका जिंकण्यासाठी स्वतः पंतप्रधान उतरत आहेत. केंद्रीय यंत्रणा कामाला लागली आहेत. गृहमंत्री आहेतच, आपले गद्दार आहेतच मुन्नाभाई ही आहे सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटून पडणार आहेत, असे ठाकरे यांनी बोलले होते. यावरून मनसेचे गजानन काळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
यावर आता मनसेने उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांना थेट मामू अर्थात मुन्नाभाई MBBS या चित्रपटातील बोमन इराणी यांच्या पात्राची उपमा दिली आहे.
आदित्य ठाकरे साठी वरळी मनसेचे उमेदवार न देता राज साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला २०१२ मनपा सेनेच्या महापौर साठी मनसेच्या ७ नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला. मुन्नाभाईचं काळीज कळायला मामुला अजून सात जन्म घ्यावे लागतील, गेटवेल सून मामू” असे गजानन काळे यांनी आपल्या ट्विटरवर ट्विट केलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे