नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लोकांच्या खिशाला महागाईचा चटका बसणार आहे. गॅस कंपन्यांनी विना अनुदानित गॅस सिलिंडर्सच्या किंमतीत १९ रुपयांची वाढ केली आहे. या प्रकारचे घरगुती एलपीजी सिलिंडर आता दिल्लीत ७१४ रुपये झाले आहेत. वाढीव दर बुधवारपासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सकाळपासून लागू आहेत.
डिसेंबरमध्ये दिल्लीत विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर (१४.२ किलो) ची किंमत ६९५ रुपये होती. एलपीजी सिलिंडरच्या बाजारभावात सलग पाचव्या महिन्यात वाढ झाली आहे. कंपन्या दरमहा दर सुधारित करतात. जानेवारीच्या दर सुधारानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडर्स (१४.२ किलो) च्या किंमतीत १९ रुपयांची वाढ केली आहे.
त्याचप्रमाणे कमर्शियल सिलिंडरच्या किंमती (१९ किलो) २९.५० रुपयांनी वाढल्या आहेत. दिल्लीत सिलिंडरसाठी आता व्यावसायिकांना १२४१ रुपये द्यावे लागतील. विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आता कोलकातामध्ये ७४७ रुपये, मुंबईत ६८४ रुपये आणि चेन्नईमध्ये ७३४ रुपये आहे.