घरगुती गॅस सिलेंडर घरपोचसाठी वाहतूकीचे दर निश्चित

श्रीरामपुर : जिल्‍हयात भारत पेट्रोलियम, हिंदुस्‍थान पेट्रोलियम व इंडेन कंपनीच्‍या एल.पी.जी गॅस वितरकांना त्‍यांच्‍या व्‍यवसाय क्षेत्राच्‍या सीमेबाहेर गॅसधारकांना घरगुती एल.पी.जी रिफील सिलेंडर द्वारपोहच ( घरपोहच) करण्‍याकरिता शासनाने दि.१ जानेवारी २०२० पासून टप्‍पेनिहाय वाहतूकीचे दर निश्चित करण्‍यात केलेले आहेत.

दि.१ जानेवारी २०२० रोजीपासून शहरी भागातील गॅसधारकांना घरगुती एल.पी.जी रिफील सिलेंडर द्वारपोहच ( घरपोहच) करण्‍याकरिता वाहतूक दर काही नाही. ग्रामीण भागासाठी ग्रॅसधारकांसाठी ० ते ५ किलो‍मीटर अंतरपर्यत काही नाही. ६ ते १० किलोमीटरपर्यत २० रुपये, ११ ते २० किलोमीटरपर्यत २५ रुपये, २१ ते ३० किलोमीटर अंतरपर्यत ३० रुपये व ३१ किलोमीटरच्‍या पुढे ५० रुपये असे टप्‍पेनिहाय वाहतूक दर निश्चित करण्‍यात आले आहेत. हे दर पुढील आदेश होईपर्यत अंमलात राहतील. सर्व नागरिकांनी पावतीपेक्षा जास्‍त रक्‍कम देण्‍याची आवश्‍यकता नाही.

तसेच टप्‍पेनिहाय गॅस वितरण दर आकारले आहेत किंवा कसे ? याबाबत नागरिकांनी सिलेंडर वितरणाच्‍या वेळी खातर जमा करण्‍यात यावी. वितरण करणारे गॅस एजन्‍सीचे कर्मचारी अतिरिक्‍त पैशांची मागणी करीत असल्‍यास वितरणाच्‍या वाहनांवर नमूद तक्रार नोंदणीसाठी देण्‍यात आलेल्‍या हेल्‍पलाईन क्रमांकावर तक्रार करण्‍यात यावी, असे जिल्‍हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी एका प्रसिध्‍दीपत्रकान्‍वये कळविले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा