पुरंदर १२,ऑक्टोबर २०२० :प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत परिंचे येथील मंजूर घरकुलांच्या पायाभरणीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव ,पुरंदर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने,माजी सरपंच समीर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत चांगदेव राऊत व सुमन अडसूळ या लाभार्थ्यांच्या घराची पायाभरणी यावेळी करण्यात आली.
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत परिंचे ते दहा घरकुले मंजूर असून तीन घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेली आहेत. उर्वरित लाभार्थींची घरकुलांची कामे तत्काळ सुरू करणे बाबत पंचायत समितीने आदेश दिले होते. या लाभार्थींनी घरकुलांची बांधकामे तात्काळ सुरू करावी व त्यांना प्रोत्साहन द्यावे याकरता घरकुल पायाभरणी कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण जिल्हाभरात करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांनी यावेळी घरकुलाचे कामे लवकरात लवकर व दर्जेदार करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. गटविकास अधिकारी अमर माने यांनी लाभार्थींना घरकुल बांधकामावेळी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी विस्ताराधिकारी सुहास कांबळे,बांधकाम शाखा अभियंता निलेश जरांडे, परिंचे गावचे माजी सरपंच समीर जाधव, सोपान राऊत, सुनील शिंदे, वैशाली शेडगे, माजी उपसरपंच सुप्रभा जाधव, ग्रामसेवक शशांक सावंत, संतोष शेडगे, ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र दुधाळ, भाऊसाहेब दुधाळ, हर्षल वाघोले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते
न्युज अनकट प्रतीनिधी :- राहुल शिंदे