घाटकोपर : पारख रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई, १७ डिसेंबर २०२२: मुंबईतील घाटकोपरमधील पारख हॉस्पिटलच्या इमारतीला आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या मजल्यावर रुग्णालय असलेल्या इमारतीमधील तळमजल्यावर असलेल्या हॉटेलच्या मागील बाजूला ही आग लागली. स्थानिकांनी तातडीने धाव घेऊन पारख रुग्णालयातील रूग्णांना ‘राजावाडी रुग्णालयात’ हलवण्यासाठी मदत केली.

याबाबत अधिक माहिती देताना मुंबई झोनचे डीसीपी पुरुषोत्तम कराड म्हणाले, या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या मदतीने आगीत अडकलेल्या सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा