भारतीय संघाला २ आठवड्यांची विश्रांती द्या, रवी शास्त्री यांची मागणी

नवी दिल्ली, ६ फेब्रुवरी २०२१: भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चेन्नई मध्ये मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. अशातच कोच रवी शास्त्री यांनी खेळाडूंना २ आठवड्यांची विश्रांती देण्यात यावी अशी मागणी केली आहे. भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ४ कसोटी सामने, ५ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने तर ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

आयपीएल २०२० ही स्पर्धा दुबई मध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि नंतर लगेचच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला होता. बायो बबल मध्ये राहणे खूप कठीण आणि थकावणारे आहे असे रवी शास्त्री यांनी म्हंटले आहे.

येत्या एप्रिल महिन्यापासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आणि संघातील मुख्य खेळाडू या स्पर्धेचा भाग असतील. २०२१ ची टी -२० विश्व कप स्पर्धा ही ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्या दृष्टीने भारतीय खेळाडूंना आयपीएल झाल्यानंतर २ आठवडयाच्या विश्रांती देण्याची मागणी रवी शास्त्री यांनी केली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाने विजय मिळवला. यामध्ये युवा खेळाडूंचा तितकाच मोलाचा वाटा होता.विराट कोहली पितृत्व रजेमुळे मायदेशी परतला होता. अजिंक्य रहाणे याने कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळली होती. अशातच संघातील मुख्य खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले होते. त्यावेळी भारतीय संघाच्या युवा खेळाडूंना संधी मिळाली आणि त्यांनी संधीचे सोने करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.

यावरून भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ किती आहे याचा सर्व संघांना अंदाज आलाच असेल. यावर रवी शास्त्री म्हणाले,’ आमच्याकडे खूप खेळाडू आहे, प्रत्येक फॉरमॅट मध्ये चांगली बेंच स्ट्रेंथ भारतीय संघाकडे आहे. तसेच या वर्षी टी -२० विश्व कप स्पर्धेचे आयोजन भारतात होणार आहे.’ यामुळेच संघातील मुख्य खेळाडूंना विश्रांती मिळणे गरजेचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा