मुंबई, ५ नोव्हेंबर २०२०: गुंतवणूकदारांना आता गुंतवणूक करण्यासाठी पुन्हा एकदा नवीन संधी आली आहे. बाजारात नवीन आयपीओ येत आहे यामध्ये रिटेल गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. ग्लॅन्ड फार्माचा आयपीओ येत्या नऊ नोव्हेंबरला येणार आहे. रिटेल इन्वेस्टर ११ नोव्हेंबर पर्यंत या आयपीओ मध्ये गुंतवणूक करू शकतात. चीन मधील फोसोन फार्माची गुंतवणूक असलेल्या ग्लॅन्ड फार्मा च्या या आयपीओ द्वारे सुमारे ६,००० कोटी रुपयांचा फंड जमा करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे.
ग्लँड फार्माच्या आयपीओची प्राईज बँड प्रति शेअर १,४९०-१,५०० रुपये निश्चित केली गेली आहे. या आयपीओ अंतर्गत १,२५० कोटी रुपयांचा नवीन इश्यू जारी केला जाईल, तर ४,७५० कोटी रुपयांची ऑफर फॉर सेल (ओएफएस) ठेवली जाईल. आयपीओमध्ये फोसान फार्मा आणि ग्लॅंड सेल्स केमिकल्स लिमिटेड आपली हिस्सेदारी विक्रीस काढतील. या आयपीओ मध्ये दहा शेअर्सचा एक लाॅट असंल. त्याच प्रमाणं रिटेल इन्वेस्टर १३ लाॅटसाठी आवेदन करू शकतात.
या आयपीओमध्ये ५०% शेअर्स संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर) राखीव आहेत आणि ३५% शेअर्स किरकोळ गुंतवणूकदार म्हणजेच रिटेल इन्वस्टर खरेदी करू शकतील. याशिवाय १५ टक्के शेअर्स बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ठेवण्यात आले आहेत. यावर्षी फोर्मा कंपनीचा हा पहिला आयपीओ आहे.
चीनमधील बहुसंख्य हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा हा पहिला आयपीओ असंल. आयपीओचे मुख्य व्यवस्थापक सिटी, नोमुरा आणि कोटक महिंद्रा बँक आहेत. बँकर्सच्या म्हणण्यानुसार, हैदराबादची फार्मास्युटिकल कंपनी ग्लॅंड फार्मा ६,००० कोटी रुपयांचा आयपीओ आणत आहे. देशातील आतापर्यंतच्या कोणत्याही औषध कंपनीचा हा सर्वात मोठा आयपीओ आहे. यापूर्वी हा विक्रम एरिस लाइफसिंसेजच्या नावावर होता, ज्या कंपनीनं २०१७ मध्ये १,७४१ कोटी रुपये जमा केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे