ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले यांचा मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार

7

माढा, ८ डिसेंबर २०२०: शिवश्री रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर जागतिक पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सत्कार माढा तालुक्यातील परितेवाडी येथे ते ज्या गावात ज्ञानदानाचे काम करतात त्यागावी करण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, मराठा सेवा संघ जिल्हा सचिव निलेश देशमुख, प्रदिप पाटील, प्रा. प्रशांत गायकवाड, बाळासो वागज, ता. सचिव आबासो गोरे, अंकुश जाधव, शंकर नागणे यावेळी उपस्थित होते.

यावेळी डिसले सर म्हणाले युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ हा जाहीर झाला असून सोलापूर च्या माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपये या पुरस्कार रूपाने मिळणार असून हे पैसे शैक्षणिक कार्यासाठी खर्च केले जाणार आहेत.

लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील १४० देशांतील १२ हजार हुन शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. क्युआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे ९ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंड करीता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळेल

यावेळी मा.जि.प.सभापती शिवाजी कांबळे, माणिक लांडे, राहूल पाटील, मा.सरपंच कृष्णात भोळे, राजकुमार पवार, मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, परितेवाडी सरपंच मोहन चव्हाण, कालीचरण गोरे, भारत चव्हाण महाराज, श्रीराम नागणे, संतोष नागणे, किसन गायकवाड, समाधान कदम सर, कालिदास शिंदे, नानासाहेब वागदरे, रणजित चव्हाण ई.उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा