“ग्लोबल वॉर्मिंग”मुळे वाढतोय पती पत्नीतील तणाव

वैवाहिक जीवन जगत असताना पती-पत्नींमध्ये अनेकदा छोट्या मोठ्या गोष्टींमुळे तणाव निर्माण होतात.

मात्र, अलिकडील काळात झालेल्या संशोधनानुसार एक खास कारण पुढे आले आहे. हे कारण तुम्ही जाणून घ्याल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण, या कारणाबाबत आतापर्यंत तसा कोणी विचारच केला नव्हता. मात्र, एका संशोधनामुळे या कारणाचा उलघडा झाला आहे.

‘ग्लोबल वॉर्मिंग’ हे सुद्धा पती-पत्नी संबंधातल्या ताणतणावचे एक प्रमुख कारण आहे. ‘नॅशनल ब्युरो ऑफ इकोनॉमिक रिसर्च’ ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात पती-पत्नीतील ताण- तणावाबाबत निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. अहवालानुसार उष्ण हवामानाचा प्रभाव कोईटल फ्रिक्वेंन्सीवर पडतो. ज्याचा थेट संबंध ‘बर्थ रेट’वर होतो.
संशोधकांनी ८० फर्टिलिटी रेट आणि तापमानाचा डेटा तूलनात्मकरित्या तपासला. तेव्हा उष्णतेच्या कारणामुळे बर्थ रेट घसलल्याचे समोर आले. या दिवसात सर्वात उष्ण दिवसात बर्थ रेट ०.४ टक्के इतका राहिला.

ट्युलेन युनिवर्सीटी ऑफ कॅलिफोर्निया आणि युनिवर्सीटी ऑफ सेंट्रल फलोरिडाने संयुक्तरित्या केलेल्या या अभ्यासात आकडेवारीसर सांगण्यात आले आहे की, ग्लोबल वॉर्मिंगबाबत त्वरीत काही उपाययोजना केली तरच, ठिक अन्यथा येत्या ६४ दिवसांमध्ये ८० डिग्री फॉरेनहाईट इतके तापमान वाढेल.

दरम्यान, केवळ भारतच नव्हे तर, जगभरात पती-पत्नीमधील नातेसंबंधांमध्ये ताणतणाव वाढताना दिसत आहे. तसेच, अनेकांच्या वैवाहीक जीवनात घटस्फोटाची संख्याही लक्षणीय वाढते आहे.
पतीपत्नीमधील ताणतणाव हे कुटूंबव्यवस्थेच्या मुळावर आलेत की काय, अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे यावर त्वरीत उपाययोजना करण्याची गरज समाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा