पुणे: गोव्याचे मुख्यमंत्री Pramod Sawant यांना ‘स्वयंपूर्ण गोवा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी Tilak Maharashtra Vidyapeeth तर्फे मानद डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली. पुण्यात आयोजित कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना सावंत यांनी सांगितले की, पंतप्रधान Narendra Modi यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेतून प्रेरणा घेऊन ‘स्वयंपूर्ण गोवा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला.
गेल्या तीन ते चार वर्षांत ‘Self-reliant Goa’ चे मॉडेल गोव्यात यशस्वीपणे राबवून दाखवले असून, या उपक्रमाचे कौतुक पंतप्रधानांनीही केले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या Board of Studies ने या कार्यक्रमाचा अभ्यास करून डी.लिट देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. या सन्मानासाठी विद्यापीठ, कुलगुरू आणि Board of Studies सदस्यांचे त्यांनी आभार मानले. सावंत यांनी ही डी.लिट पदवी गोव्याच्या जनतेला तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांना समर्पित करत, पंचायत स्तरापासून सर्व अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाल्याचे नमूद केले. गेल्या पाच वर्षांपासून ‘स्वयंपूर्ण गोवा’ सातत्याने राबवला जात असून आता ‘स्वयंपूर्ण 2.0’ अंतर्गत skilling, reskilling आणि upskilling यावर विशेष भर दिला जाणार आहे.
गोव्यातील युवक आणि महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात येणार असून या उपक्रमात टिळक महाराष्ट्र विद्यापीठही सहभागी होणार आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरमध्ये युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सहकार्य मिळणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनीधी : दिनेश वढणे











































