पणजी, १४ जुलै २०२३: गोव्यात आयुष विभागातील पाच प्रकारचे उपचार कलणारे देशातील पहिले रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनवाल यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेद उपचार पद्धतीला प्राधान्य देऊन गोव्याला केंद्र बनविले. युनानी, सिद्धा, नॅचरोपॅथी, योगा, आयुर्वेद व होमिओपॅथी अशा विविध प्राचीन उपचारांचे मोफत उपचार व संशोधन केंद्र सुरू केले आहे. गोव्यामध्ये धारगळ येथे भव्य आयुष पदवी महाविद्यालय रुग्णालय सुरू केल्यानंतर, रायबंदर येथे आयुषपॅथी आरोग्य उपचार केंद्र सुरू झाले आहेत. यामुळे येथे विविध पाच विभागाचे उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध असलेले देशातील पहिले रुग्णालय असणार आहे.
जगामध्ये आयुष उपचार पद्धतीला स्विकारल्याचे आयुष मंत्री सर्वानंद सोनवाल यांनी सांगितले. तर गोमंतकीयांना मोफत उपचार पद्धत घेण्याची सोय झाली आहे, तसेच आयुष विभागातील आयुर्वेद डॉक्टरांना आता घाबरण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी प्रतिपादन केले.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर