गोल पोस्ट गुन्हा गोवा पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा

गोवा पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा

वागेटर (गोवा) , १९ ऑगस्ट,२०२० : १६ ऑगस्ट रोजी सनबर्न ईडीएम महोत्सवाच्या सह-आयोजकांना वागेटरमध्ये आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीच्या संदर्भात मंगळवारी गोवा गुन्हे शाखेने अटक केली, ज्यात तीन परदेशी व्यक्तिंसह २३ जण होते.पोलिस अधीक्षक (गुन्हे शाखा) शोभित सक्सेना यांनी एएनआयला सांगितले की, रेव्ह पार्टी प्रकरणातील पाठपुरावा चौकशीत सनबर्न ईडीएम उत्सव आयोजित करणाऱ्या शैलेश शेट्टी यांना या प्रकरणात सामील केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.

तसेच ते म्हणाले की,” शेट्टी यांना नारकोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स अ‍ॅक्ट अंतर्गत अटक करण्यात आली आहे.”शनिवारी आणि रविवारी झालेल्या रॅव्ह पार्टीच्या संदर्भात एकूण २४ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सक्सेना यांनी दिली.

१५ ते १६ ऑगस्ट दरम्यान मध्यरात्री पोलिसांना रेव्ह पार्टीबद्दल माहिती मिळाल्यानंतर हा छापा टाकण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी :

error: Content is protected !!
Exit mobile version