गोल पोस्ट राष्ट्रीय पीएम केअर्स निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषात वर्ग करण्यासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं...

पीएम केअर्स निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषात वर्ग करण्यासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

नवी दिल्ली, १९ ऑगस्ट २०२०: पीएम केअर्स निधीत जमा झालेला निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषात वर्ग करण्याची सूचना केंद्र सरकारला करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. एका सेवाभावी संस्थेनं ही याचिका दाखल केली होती.

न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं काल केलेल्या सुनावणीची मागणी नाकारली, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार अशा प्रकारच्या मदत संकलनाला कोणतंही घटनात्मक बंधन नसल्यानं, आपत्ती प्रतिसाद कोषात स्वेच्छा मदत निधी सतत जमा होऊ शकतो, असं नमूद केलं.

न्यायालयाच्या या निर्णयाचं भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी स्वागत केलं आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या पीएम केअर्स फंड अर्थात प्रधानमंत्री नागरी सहायता आणि आणीबाणीच्या परिस्थितीतल्या मदत निधीचे प्रधानमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष, तर संरक्षण, गृह आणि अर्थ खात्याचे केंद्रीय मंत्री हे पदसिद्ध विश्वस्त आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version