पुणे, 8 जुलै 2022: हॉलिवूडचे दिग्गज जेम्स कोहन यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं. द गॉडफादर आणि ब्रायन सॉन्ग यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांमध्ये वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या जेम्स कोनने अनेक दशके हॉलीवूड उद्योगावर राज्य केलं. त्यांचं जाणं संपूर्ण इंडस्ट्रीचं मोठं नुकसान आहे.
जेम्स यांच्या स्वतःच्या ट्विटर हँडलवरून त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आलीय. कुटुंबियांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, अत्यंत दु:खाने कळवत आहे की, 6 जुलै रोजी संध्याकाळी जिम्मी यांचं निधन झालं. आम्ही चाहते आणि शुभचिंतकांच्या भावनांचा आदर करतो. कृपया या कठीण काळात तुमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेची काळजी घ्या. जेम्स यांच्या जाण्याने संपूर्ण इंडस्ट्री शोकाकुल झाली आहे. सेलेब्स सतत ट्विट करत या महान कलाकाराला श्रद्धांजली अर्पण करत आहेत, त्यांनी साकारलेल्या पात्रांची आठवण करून देत आहेत.
अभिनेत्याच्या काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल सांगायचं तर, त्यांनी ‘काउंटडाउन’, ‘द रेन पीपल’, ‘फनी लेडी’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. 2021 मध्ये ‘क्वीन बीज’ या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात ते शेवटचे पडद्यावर दिसले.
जेम्स यांचं फिल्मी करिअर जितकं चर्चेत होतं तितकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्य देखील सतत चर्चेत राहिलं. कधी ड्रग्जमुळे ते चर्चेत होते तर कधी त्यांच्या रागामुळं ते चर्चेत आले होते. त्यांचं लव्ह लाईफही वादात सापडलं होतं. त्यांनी चार वेळा विवाह केला आणि घटस्फोट घेतला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे