महाराष्ट्रातील प्रसिद्ध सुवर्णनगरी, जळगावमध्ये सोने ५६ हजारांवर

16

जळगाव, २२ डिसेंबर २०२२ : गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत असला, तरी म्हणावे तेवढे सोने उतरताना दिसत नाही. सोन्याची झळाळी वाढतच आहे. महाराष्ट्रातील सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावमध्ये तर सोने ५६ हजारांवर पोचले आहे.

जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात सराफ मार्केट आहे. तिथे सोन्याच्या दागिन्यांची आणि सोनं खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल होत असते. अशा ठिकाणी सोन्याचे दर आज ५६ हजार ६५० रुपयांवर पोचले आहेत. ऐन लग्नसराईत भाव गगनाला पोचल्याने सोने खरेदी करणे अवघड होत चालले आहे.

दुसरीकडे चांदीचे दरही वाढताना दिसत आहेत. प्रतिकिलोमागे चांदीसाठी ग्राहकांना ७० हजार रुपये मोजावे लागणार आहेत. ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव ५७ हजारांपर्यंत पोचले असून, चांदीचे भावही ७० हजार रुपये प्रतिकिलो झाले आहेत.

जळगाव सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचे भाव ५६ हजार ६५० रुपये झाले आहेत. तर चांदीचा भाव ७० हजार रुपये झाले आहे. जागतिक बँकेने घटविलेले व्याजदर, चीनमधील वाढता कोरोना व डॉलरच्या किमतीचा परिणाम सोन्याच्या भाववाढीवर झाल्याचे मत सोनेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा