तीन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या सराफी दुकानातून लंपास

बारामती, ३ ऑगस्ट २०२० : बारामती शहरातील सराफाच्या दुकानात गर्दीचा फायदा घेत ३ लाख १० हजार रुपये किमतीच्या ४ सोन्याच्या बांगड्या चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तनिष्क ज्वेलर्सचे मॅनेजर सागर दिलीप देवकर (वय ३५ वर्ष ) यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

बारामती शहरात सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व व्यावसायिकांना सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ ठरवून दिली आहे.त्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. याचाच फायदा घेत भिगवण रोड वरील तनिष्क ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दि ३१ शुक्रवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी महिला व पुरुषाने सोन्याच्या बांगड्या खरेदी करण्याचा बहाणा करत दुकानात प्रवेश केला.

येथील सेल्समन प्रशांत सोनवणे हे सोन्याच्या बांगड्या दाखवत असताना त्याची नजर चुकवून या तीन अनोळखी आरोपींनी हातचलाखीने दुकानातून ४८.८४३ ग्रॅम वजनाच्या ३ लाख १० हजार रुपये किमतीच्या ४ सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची फिर्याद बारामती शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे आहे. सदर घटनेचा तपास सहाय्यक फौजदार तात्यासाहेब खाडे करीत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा