सुवर्ण रोखे योजना २०२०-२१, ही आहे इश्यू किंमत

नवी दिल्ली, २७ फेब्रुवरी २०२१: भारत सरकारची ९ ऑक्टोबर २०२० ची अधिसूचना क्र. ४(४) B(W&M)/२०२० नुसार सार्वभौम सुवर्ण रोखे योजना २०२०-२१( मालिका XII) १ ते ६ मार्च २०२१ या कालावधीत खुली होणार आहे.

तिची सेटलमेंट तारीख ९ मार्च २०२१ आहे. या रोख्यांची सदस्यत्व कालावधीदरम्यान इश्यू किंमत ४,६६२ रुपये (रुपये चार हजार सहाशे बासष्ट फक्त) प्रति ग्राम असेल. रिझर्व बँकेने २६ फेब्रुवारी २९२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात देखील ती नमूद केली आहे.

जे गुंतवणूकदार या रोख्यांसाठी ऑनलाईन अर्ज करतील आणि डिजिटल माध्यमातून त्याचे पैसे चुकते करतील त्यांना प्रति ग्राम ५० रुपये सवलत देण्याचा निर्णय भारत सरकारने रिझर्व बँकेशी विचारविनिमय करून घेतला आहे. अशा गुंतवणुकदारांसाठी या सुवर्ण रोख्यांची किंमत ४६१२ रुपये( रुपये चार हजार सहाशे बारा फक्त) प्रति ग्राम सोने अशी असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा