पुण्याचे गोल्ड मॅन आणि त्यांचं आयुष्य….

9

पुणे, दि.६ मे २०२०: पुणे शहरात आपण तीन गोल्ड मॅन पाहिले. या गोल्ड मॅननी आपल्या क्षेत्रामध्ये चांगले नाव कमावून सर्वांवर आपली छाप सोडून गेले. कुणी वारकरी संप्रदायातील, कुणी सामाजिक कार्यातील , तर कुणी व्यवसायात पारंगत होते. त्यांच्या अंगावरील सोन्याने त्यांना एक उंचीवर नेऊन ठेवले होते. दिवसभर आपल्या अंगावर कैक किलोपेक्षा अधिक सोने बागळणे तसे जिकीरीचेच होते. पण तरीही फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी या व्यक्तींनी ही सोने बाळगण्याची रिस्क घेतली होती. मात्र त्यांना त्यांच्या आयुष्याच्या लढाईमध्ये पराभवच पत्करावा लागला. असे हे पुण्यातील तीन गोल्ड मॅन तुम्हाला माहीत आहेत का…

रमेश वांजळे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडकवासल्याचे आमदार म्हणून वांजळे यांची ओळख होतीच. मात्र त्यांचा वारकरी सांप्रदायाचाही चांगला अभ्यास होता. ते दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ यात्रेला घेऊन जात असत. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना सोनेरी आमदार म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या भाषणामध्ये एक दरारा होता. एखाद्या सेलिब्रेटी पेक्षाही लोक त्यांना बघण्यासाठी गर्दी करायचे. माणूस शरीर यष्टीने खूप धडधाकट. मात्र जून २०११ मध्ये त्यांना वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांचं अस्तित्व संपले.

दत्ता फुगे : दत्ता फुगे हे पिंपरी चिंचवडचे रहिवासी होते. त्यांनीही फार कमी कालावधीत आपली ओळख गोल्ड मॅन म्हणून निर्माण केली होती. त्यांच्या अंगावर ६ ते ७ किलो सोने नेहमी असायचे. त्यानंतर ते माध्यमांसमोर आले होते. शिवाय त्यांनी निवडणुकीसाठी प्रयत्नही केले होते. मात्र यश आले नाही. मात्र एका आर्थिक व्यवहारातून त्यांचा खून करण्यात आला. त्यांचं वयही अवघे ४६ वर्षे होते.

सम्राट मोझे : फार कमी कालालवधीत पुण्याचे गोल्ड मॅन अशी ख्याती सम्राट मोझे यांनी मिळवली होती. अंगावर ८ ते १० किलो सोने ते घालत असत. माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे ते पुतणे होते. याशिवाय राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून ते माध्यमांमध्ये मुलाखत देण्यासाठी गेले होते. मात्र नुकतेच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचं वय अवघे ४५ वर्षे होते. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

असे हे तीन गोल्ड मॅन आपल्या पुण्याला लाभले. मात्र त्यांना आपलं आयुष्य जास्त मिळू शकले नाही. याची आठवण मात्र पुणेकरांना झाल्या शिवाय राहणार नाही.


न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर