पीएमपी बसमध्ये महिलेच्या हँडबॅगमधून सोन्याचे दागिने चोरी

13

हडपसर २८ जानेवारी २०२५ : पीएमपी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या हँडबॅगमधून चोरट्याने साडेचार तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार हडपसर गाडीतळ बसथांबा ते फुरसुंगी या दरम्यान घडला. कविता देविदास जगताप (वय ३५) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महिलेच्या हँडबॅगमधील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या हडपसर पोलिस चोरट्यांचा शोध घेत असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार सचिन जाधव करत आहेत. बसमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांनी आपल्या वस्तू सुरक्षित ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा