मुंबई, १० जुलै २०२०: संपूर्ण जगभर कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि संकट कमी न होत असताना आता देशाच्या आर्थिक महामंदीचा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. सोन्याच्या दारात दिवसेगणिक वाढ होत चालली आहे. अंतराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर सोन्याने आपल्या भावाची वाटचाल गगनभेदी उंचीकडे सुरु केली आहे.
मागील आठवड्यातील ४९ हजार प्रतितोळा दर आज मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे दर ५१ हजार ८५ रुपये झाला आहे. सध्या मैल्यवान धातूंच्या किंमतीमध्ये आलेल्या तेजीनंतर ईटिफ मध्ये देखील गुंतवणूक वाढली दिसून येत आहे. शिवाय डॉलरमध्ये देखील घसरण झल्यामुळे सोन्याचे दर आजून वधारले आहेत.
जून २०२० च्या सुरवातीला सोन्याचे दर ४९ हजार ३१८ रूपये प्रती तोळा होते, तेच आज ५० हजारांवर पोहोचले आहे. येत्या आणखी काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने वर्तवली आहे. देशात कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढत प्रादुर्भाव चा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर देखील झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी