‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा वर बक्षिसांचा वर्षाव…

हरियाणा, ८ ऑगस्ट २०२१: टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने इतिहास रचल्यानंतर हरियाणा सरकारने त्यांच्यासाठी भेटवस्तूंचा वर्षाव केला आहे.  कोणत्याही एथलेटिक्स स्पर्धेत हा विक्रम करणारा नीरज पहिला खेळाडू ठरला आहे.  त्यानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी त्यांना ६ कोटी रुपये दिले आहे.  रोख रकमेबरोबरच अनेक बक्षिसे देण्यात आली आहेत. तब्बल १२१ वर्षानंतर नीरज चोप्राने ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले. नेमबाज अभिनव बिंद्रा नंतर वैयक्तिक स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला.
याबरोबरच देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने नीरज चोप्राला त्यांची आगामी XUV700 SUV गाडी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर याबाबत घोषणा केली आहे. महिंद्रा कंपनी आपली फ्लॅगशिप XUV700 SUV गाडी येत्या आठवड्यात लॉन्च करणार आहे. महिंद्रा आपल्या आगामी XUV700 SUV गाडीचा जोरदार प्रचार करत आहे. या वर्षातील सर्वात अपेक्षित गाड्यांपैकी ती एक गाडी आहे.
१२१ वर्षांनंतर…
ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स म्हणजे अॅथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा