कोल्हापुर मधील नागरिकांसाठी आनंदाची बातमी; कोल्हापुर ते मुंबई विमान प्रवास फक्त चाळीस मिनिटांत

14

कोल्हापुर, १० ऑक्टोबर २०२२: संजय घोडावत समूहाच्या स्टार एअरनं कोल्हापुर ते मुंबई विमान सेवा सूरु केली आहे. ही सेवा देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. अशी भावना समुहाचे संस्थापक संजय घोडावत यांनी सांगितली आहे. या माध्यमातून ग्राहकांना आरामदायी प्रवास उपलब्ध करुन देण्याचा ग्रुपचा प्रयत्न आहे.

स्टार एअरच्या फ्लाइटचे कोल्हापुर हे १९ वे डेस्टिनेशन आहे. यामुळे पर्यटक कोल्हापुर शहर आणि जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणांकडे आकर्षित होतील. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देखील त्याचा फायदा होईल असं स्थानिक नागरिकांनी सागितले.

या विमान सेवा मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस आसणार आहे. या सेवेमुळे सुमारे चाळीस मीनीटांत प्रवाशांचा प्रवास पुर्ण होणार आहे. किमान आठ ते दहा तासांची बचत होणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यानंतर उड्डाणे वाढवण्यात येणार आहेत.

सरकारच्या उडाण योजनेंतर्गत स्टार एअर प्रवाशांना सुविधा देणार असल्याचे घोडावत यांनी सांगितले आहे. ही विमान सेवा सूरु झाल्यांने कोल्हापुरकरां मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर