सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी,आता मिळणार जास्त पैसे…

नवी दिल्ली, २० जुलै २०२० : केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी मान्य करत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना नाइट शिफ्ट अलाउंस दिला जाणार आहे.कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने याबाबतचे निर्देश दिले आहेत.१ जुलैपासूनच हे नियम लागू झाल्याची माहितीही देण्यात आली आहे.

आत्तापर्यंत पगाराच्या ग्रेडवरून अशा प्रकारचा अलाउंस दिला जात होता.आता ही पद्धत रद्द करण्यात आली आहे. सातवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी अशा प्रकारची पद्धत होती. रात्री १० ते सकाळी ६ या काळात केलेल्या कमालाच नाईट शिफ्ट समजली जाणार आहे.नाईट शिफ्ट अलाउंससाठी एक बेसिक पे आधार मानला गेला आहे. ४३,६०० रुपये बेसिक पगार हा त्यासाठी आधार मानण्यात आला आहे.

नाईट शिफ्ट अलाउंस तासांच्या आधारावर दिला जाणार आहे. तो BPDA/२०० च्या समकक्ष असणार आहे.बेसिक आणि महागाई भत्ता हा सातव्या वेतन आयोगाच्या नियमांनुसारच गृहित धरला जाणार आहे.सर्व मंत्रालये आणि विभागांसाठी हा नियम लागू असेल.

आधीची किचकट पद्धत बाजूला करून सुटसुटीत आणि अधिक न्याय असलेली ही पद्धत कर्मचाऱ्यांच्या फायद्याची आहे असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.नाईट शिफ्टसाठीच्या अलाउंसमध्ये बदल करण्याची मागणी गेली अनेक वर्ष होत होती.ती यावेळी मान्य करण्यात आली आहे.मात्र काही संघटनांनी या पद्धतीतही त्रूटी असल्याचं म्हटलं आहे.सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी मान्य केल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजाही पडणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा