घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर..! एसबीआयनं आपल्या व्याजदरात केली घट

नवी दिल्ली, ९ जानेवारी २०२१: घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांसाठी ही चांगली बातमी आणली आहे. बँकेनं गृह कर्जाचे दर ३० बेसिस पॉईंट म्हणजेच ०.३ टक्क्यांनी कमी केले आहेत.

इतकंच नाही तर बँकेनं प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे. आठ मोठ्या शहरांतील गृह कर्जासाठीही हा व्याज दर उपलब्ध असून तो पाच कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर उपलब्ध असेल.

व्याज दर किती असेल

बँकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, गृह कर्जावरील नवीन व्याज दर सीआयबीआयएलच्या स्कोअरशी जोडले गेले आहेत आणि ३० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी ६.८० टक्के दरानं सुरू झाले आहेत, तर ३० लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे व्याज दर ६.९५ टक्के पासून सुरू होईल.

महिला कर्जदारांना अतिरिक्त सूट मिळंल

महिला कर्जदारांना ०.०५ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूट मिळणार असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. या निवेदनात म्हटलं आहे की, “घर खरेदीदारांना आकर्षक सवलती देण्याच्या उद्देशानं देशातील सर्वात मोठी सावकार एसबीआयनं गृह कर्जात ३० बीपीएस (०.३० टक्के) आणि प्रक्रिया शुल्कावरील १०० टक्के सूट जाहीर केली आहे.”

२०२१ पर्यंत सवलत मिळेल

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (रिटेल आणि डिजिटल बँकिंग) सीएस सेट्टी म्हणाले की, “आम्ही आमच्या संभाव्य गृहकर्ज ग्राहकांना मार्च २०२१ पर्यंत सवलत देण्यास तयार आहोत.”

आपण योनो अ‍ॅपद्वारे अर्ज करू शकता

पाच कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी आठ महानगरांमध्येही ०.३० टक्क्यांपर्यंत व्याज सवलत उपलब्ध असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. निवेदनात म्हटलं आहे की योनो अॅपद्वारे ग्राहक सहजपणे घरातून कर्जासाठी अप्लाय करू शकतात आणि ०.०५ टक्के व्याज सवलत मिळवू शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा