MPSC विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 5300 जणांना मिळणार नोकरी

मुंबई, 11 मे 2022: एमपीएससी च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलीय. 2019 मध्ये जिल्हा परिषद मधील आरोग्य विभागात भरतीसाठी जाहिरात करण्यात आली होती. मात्र गेल्या तीन वर्षापासून ही भरती प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळं प्रलंबित होती. जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील पदासाठी ही जाहिरात काढण्यात आली होती. आता ही बरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले गेले असल्याने विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

मंगळवारी राज्य शासनाने शासन निर्णय काढत 2019 ची भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार 2019 मध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही. भरती प्रक्रिया सुरु करण्याबाबतच सकारात्मक चिन्ह दिसून लागल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

5300 जणांच्या भरतीचा मार्ग मोकळा

जिल्हा परिषदेने मार्च 2019 मध्ये आरोग्य विभागासाठी भरती जारी केलेली होती. पण कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलली गेली. जिल्हा परिषदेमार्फत 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आता राज्य सरकारनं जारी केलेल्या निर्देशांनुसार 5300 जणांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालाय. यासाठी शैक्षणिक पात्रता औषध निर्माता यासाठी B.Pharm/D.Pharm ची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच MS-CIT/CCC हे संगणकीय ज्ञान असणे गरजेचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा