मुंबईकरांसाठी खुशखबर! टाटा पॉवरच्या ७.५ लाख वीज ग्राहकांच्या बीलात कपात

मुंबई, १४ जुलै २०२३: वीज वितरण कंपनी टाटा पॉवरने शुक्रवारी सांगितले की, मुंबईतील ७.५ लाख ग्राहकांच्या वीज दरात अपीलीय न्यायाधिकरणाच्या (एपीटीईएल) अंतरिम आदेशानंतर कपात केली जाईल. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) वीज दरवाढीच्या प्रस्तावाला मार्चमध्ये मंजुरी दिली होती. टाटा पॉवरने याविरोधात एपीटीईएल मध्ये अपील केले. तेथून एमईआरसीच्या निर्णयावर स्थगिती आदेश देण्यात आला आहे.

टाटा पॉवरने एका निवेदनात म्हटले आहे की, “आज पारित झालेल्या एपीटीईएल च्या आदेशाने वीज दर वाढवण्याच्या एमईआरसीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या परिस्थितीत कंपनीने ३१ मार्च २०२० रोजी सुचवलेले दर पुन्हा एकदा लागू झाले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे दर सध्याच्या वीज दरांपेक्षा २५-३५ टक्के कमी आहेत आणि मुंबईतील सुमारे ७.५ लाख ग्राहकांना त्याचा फायदा होईल.

टाटा पॉवरचे अध्यक्ष (पारेषण आणि वितरण) संजय बंगा म्हणाले, “आम्ही हे सुनिश्चित करू की अपील न्यायाधिकरणाकडून मिळालेला दिलासा, आमच्या ग्राहकांना कमी विजबिलातून दिला जाईल. या प्रकरणातून अर्थव्यवस्थेबद्दलची आमची वचनबद्धता आणि कामकाजात असणारी निष्पक्षता दर्शवते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा