एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता वर्षभर कुटुंबासोबत मोफत प्रवासाची संधी!

21

पुणे १५ फेब्रुवारी २०२५ : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! आता एसटी कर्मचाऱ्यांना वर्षभरात तब्बल चार महिने आपल्या कुटुंबासोबत मोफत प्रवास करता येणार आहे.

कधी करता येणार प्रवास?

मार्च ते जून या कालावधी वगळता इतर कोणत्याही वेळी कर्मचारी या पासचा वापर करू शकतात. त्यामुळे आता कुटुंबासोबत प्रवास करणे अधिक सोपे आणि आनंददायी होणार आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीही सुविधा

यासोबतच, निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी देखील दोन महिन्यांचा मोफत प्रवास पास उपलब्ध असणार आहे. त्यामुळे निवृत्तीनंतरही एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला प्रवासाची सोय मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांचा आनंद

या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी या सुविधेचे स्वागत केले आहे. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवण्याची आणि एकत्र प्रवास करण्याची संधी मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आहे.

अटी व शर्ती

  • मोफत पासचा वापर गर्दीच्या हंगामात करता येणार नाही.
  • मार्च ते जून आणि दिवाळीच्या काळात पास वापरता येणार नाही.
  • पास दोन टप्प्यात वापरता येईल – जानेवारी ते फेब्रुवारी आणि जुलै ते डिसेंबर.

एसटी महामंडळाचा स्तुत्य निर्णय

एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यास मदत होईल आणि त्यांना कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा