टीम इंडियासाठी चांगली बातमी, रवींद्र जडेजा मेलबर्न टेस्टमध्ये खेळण्याची शक्यता

मुंबई, २२ डिसेंबर २०२०: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (२६ डिसेंबर) बॉक्सिंग डे टेस्टपूर्वी रवींद्र जडेजाच्या दुखापतीवर भारतीय संघ व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे. हा अष्टपैलू फिट असेल तर तो मेलबर्न कसोटी खेळणार्‍या इलेव्हनमध्ये हनुमा विहारीची जागा घेऊ शकेल.

टी -२० आंतरराष्ट्रीय मालिकेदरम्यान जडेजाच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्यानंतर त्याच्या पायाचे स्नायू देखील ताणले गेले, ज्यामुळे तो पहिल्या कसोटीतून वगळला गेला. पहिल्या कसोटीत भारताला पराभव पत्करावा लागला होता आणि या दरम्यान जडेजा नेटवर परतला.

हा अष्टपैलू खेळाडू ठीक झाला आहे, अशी माहिती मिळाली आहे, परंतु २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात तो १०० टक्के तंदुरुस्त होईल, हे निश्चितपणे सांगता येणार नाही.

जर जडेजा आपल्या झालेल्या दुखापती मधून पूर्ण बरा झाला तर आंध्र प्रदेशचा फलंदाज विहारीला प्ले इलेव्हनमधून बाहेर पडावे लागू शकेल. एडिलेड मधील पहिल्या कसोटी सामन्यात बिहारी ने केलेले खराब प्रदर्शन हे त्याच्या बाहेर जाण्यास कारणीभूत नाही, तर अजिंक्य रहाणे आणि रवी शास्त्री यांनी केलेले उत्तम संयोजन आहे.

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, “जर जडेजा नेहमीप्रमाणे आपल्या मोठ्या स्पेल टाकण्यास समर्थ असेल तर चिंतेचे कोणतेच कारण नाही. म्हणजेच जडेजा त्याच्या अष्टपैलू कौशल्यांच्या आधारे विहारीची जागा घेईल. तसेच, यामुळे आपल्याला ५ गोलंदाजांसह एमसीजीवर उतरण्याचा पर्याय उपलब्ध होईल. ”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा