राज्यासाठी दिलासादायक बातमी, दिवसभरात ७१,७३६ कोरोना रूग्णांना डिस्चार्ज

मुंबई, २७ एप्रिल २०२१: सध्या राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून महाराष्ट्राला थोडीशी दिलासादायक देणारी बातमी आलीय. २६ एप्रिल रोजी राज्यात दिवसभरात ७१,७३६ कोरोना रूग्णांना डिस्चार्जड देण्यात आला. ही कोरोनामुक्तिची रूग्ण संख्या महिन्या भरातील सर्वात अधिक प्रमाणात वाढ झालेली पहिलीच वेळ आहे.

गेल्या २४ तासात राज्यात ४८,७०० नव्या कोरोना रूग्णांची नोंद झालीय. तसंच ५२४ रूग्णांचा या विषाणु मुळं मृत्यू झाला आहे. तसं गेल्या काही दिवसांपासून येत आसलेल्या रूग्ण वाढीच्या दृष्टीनं ही रूग्ण संख्या कमी आहे. ज्यामुळं थोडासा दिलासा राज्याला मिळाला आहे. तर राज्यात सध्या ६,७४,७७० ॲक्टीव्ह रुग्णांवर उपचार चालू आहेत.

मुंबई पुण्यासारख्या दाट वस्ती असलेल्या शहरात ही थोडासा दिलासा……

मुंबई मधे २६ एप्रिलला ९,१५० रूग्ण कोरोना मुक्त झाले. तर ३,८७६ नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आसून ७० रूग्णांचा मृत्यू झालाय. सध्या मुंबईत ७०,३७३ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी ६२ दिवसांवर गेलाय.

पुण्यामध्येही कोरोनाची परिस्थिती सध्या सुधरत आहे. हे आपण पाहणार आसलेल्या ८ दिवसांच्या आकडेवारी वरून सिद्ध होते.

१९ एप्रिल : नवे कोरोना रूग्ण ४,५८७

बरे झालेले रूग्ण ६,४७३

२० एप्रिल : नवे कोरोना रूग्ण ५,१३८

बरे झालेले रूग्ण ६,८०२

२१ एप्रिल : नवे कोरोना रूग्ण ५,५२९

बरे झालेले रूग्ण ६,५३०

२२ एप्रिल : नवे कोरोना रूग्ण ४,५३९

बरे झालेले रूग्ण ४,८५१

२३ एप्रिल : नवे कोरोना रूग्ण ४,४६५

बरे झालेले रूग्ण ५,६३४

२४ एप्रिल : नवे कोरोना रूग्ण ३,९९१

बरे झालेले रूग्ण ४,७८९

२५ एप्रिल : नवे कोरोना रूग्ण ४,६३१

बरे झालेले रूग्ण ४,७५९

२६ एप्रिल : नवे कोरोना रूग्ण २,५३८

बरे झालेले रूग्ण ४,३५१

सध्या या एक दोन दिवसात राज्याला दिलासा देणारी आकडेवारी जरी समोर आली आसली तरी आजून कोरोना स्थितीतला लढा आजून ही चालूच आहे.या परिस्थिती मध्ये नागरिकांनी देखील सरकारने घातलेल्या निर्बंधाचे काटेकोरपणे पालन केले आणि वेळोवेळी हात धुणे,सोशल डिन्सटंस,मास्क आणि सेनेटायझर चा वापर केला तर लवकरच आपण मोकळा श्वास घेऊ.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा