पुणे, २६ ऑगस्ट २०२१: Google ने गेल्या आठवड्यात नवीन ट्रू वायरलेस इयरबड्स Pixel Buds A-Series भारतात लाँच केले. Google कडून या नवीन TWS इयरबड्सची विक्री कालपासून म्हणजेच २५ ऑगस्टपासून भारतात सुरू झाली आहे. काल फ्लिपकार्टवर दुपारी १२ पासून या डिवाइसची विक्री सुरू झाली आहे.
स्पेशल लॉन्च प्राइस अंतर्गत, हे बड्स १,००० रुपयांच्या सूटानंतर ८,९९९ रुपयांना विकल्या जात आहेत. ग्राहक काल (२५ ऑगस्ट) मध्यरात्रीपर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकणार होते. फ्लिपकार्ट व्यतिरिक्त, ग्राहक हे प्रॉडक्ट रिलायन्स डिजिटल आणि टाटा क्लिक द्वारे देखील घेऊ शकतात.
बंडल ऑफर अंतर्गत, Pixel 4a वापरकर्ते देखील ते ४,९९९ रुपयांना खरेदी करू शकतात. ही ऑफर ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू राहील. हे डिवाइस ग्राहकांना क्लिअर व्हाईट कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Pixel Buds A-series अमेरिकेत लॉन्च केलेल्या मूळ बड्सची ट्रिम डाउन आवृत्ती आहे. यात काही वैशिष्ट्ये नाहीत. पण, गूगलचा दावा आहे की ए-सीरिजला ओरिजनल Buds सारखीच साउंड क्वालिटी मिळेल. या उपकरणात 12mm कस्टम डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत.
Low टोन्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या इअरबड्समध्ये बास बूस्ट मोड देखील देण्यात आला आहे. यासह, अॅडॅप्टिव्ह साउंडचे वैशिष्ट्य देखील या डिव्हाइसमध्ये देण्यात आले आहे. हे वापरकर्त्यांच्या आजूबाजूच्या आवाजानुसार आवाज वाढवते.
हे बड्स चांगल्या कॉलिंग अनुभवासाठी बीमफॉर्मिंग माइक वापरतात. हे बड्स एकाच चार्जमध्ये ५ तासांपर्यंत टिकतात. यामध्ये गुगल असिस्टंटचेही सपोर्ट देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, वापरकर्ते Hey Google, play my music कमांड देऊन संगीत ऐकू शकतील. या बड्समध्ये ४० पेक्षा जास्त भाषांसाठी रिअल टाइम ट्रान्सलेशनचे वैशिष्ट्य आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे