कॅलिफोर्निया, १० सप्टेंबर २०२०: ट्रू कॉलर ॲपपासून आपण सर्वच परिचित आहोत. ट्रू कॉलर ॲप हा आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. आपल्याला बऱ्याच वेळा फ्रॉड कॉल्स येतात. या फ्रॉड कॉल्सची माहिती आपल्याला ट्रू कॉलर सारख्या ॲपमुळे मिळत आहे.
परंतु गुगल कडून नुकतीच वेरिफाइड कॉल्स फीचरची घोषणा करण्यात आली आहे. या फीचरमुळे आपल्याला कोण कॉल करीत आहे, का करत आहे हे कळणार आहे. या फिचरला गुगल फोन ॲपचे भाग बनवले आहेत. हे नवीन फीचर आणण्यामागे फ्रॉड कॉल हे कारण सुद्धा आहे.
गुगल फोन मध्ये आपल्याला नवीन फीचर्स पाहायला मिळणार आहेत. गुगल पिक्सेल सिरीज शिवाय खूप अँडरॉइड फोनमध्ये डिफॉल्ट गुगल फोन ॲप हेच डायलरचे काम करीत असतात. गुगलच्या नवीन फोन मध्ये नवीन फीचर्स अपडेटसोबत मिळेल. जर फोनमध्ये गुगल फोन ॲप इंस्टॉल नसेल तर गुगल प्ले स्टोरवरून ते इंस्टॉल केले जाऊ शकते.
गुगलचे हे नवीन फीचर युजर्सना बिझनेस कॉल जाणून घ्यायचे कारण, सुद्धा सांगणार आहे. हे फीचर अद्याप ट्रू कॉलर मध्ये उपलब्ध नाही.
न्युज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे