गोपीनाथ गडावर पालकमंत्री धनंजय मुंडे नतमस्तक

17

बीड, दि.३जून २०२०: लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज ६ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी समोर नतमस्तक होऊन दर्शन घेतले.

अप्पा, आज तुमचा स्मृतिदिन. तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात.. तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजुर, कष्टकरी, वंचित-उपेक्षित, दीन दुबळ्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांचा  विकास साधण्यासाठी मला बळ द्या! असे ट्विट करत धनंजय मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले.

यावेळी परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. सोशल डिस्टस्टिंगचे पालन करत पालकमंत्र्यांनी अभिवादन केले.

न्युज अनकट प्रतिनिधी: