लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा फोन नंबर पुन्हा चालू होणार.

बीड: पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे काम यापुढे राज्यभर करण्याचे जाहीर केले आहे. म्हणून गोपीनाथ मुंडे मुंबईमध्ये ज्या कार्यालयात बसून काम करायचे त्याच कार्यालयात बसून पंकजा मुंडे पुन्हा काम करणार आहेत. आणि विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे त्यांच्या कार्यकाळात जो नंबर त्यांच्या कार्यालयात वापरायचे तोच टेलिफोन नंबर पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी चालू केला तसेच तोच नंबर पंकजा मुंडे त्यांच्या कार्यालयात वापरणार आहेत.
पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुकवरील अधिकृत पेजवर “आपले वडील गोपीनाथ मुंडे जो फोन वापरत होते तोच फोन नंबर पुन्हा एकदा परत चालू केल्याची माहिती अपडेट केली. “मंत्रीपदी असताना मागील पाच वर्षापासून पंकजा मुंडे रॉयल स्टोन वरून आपल काम पाहायच्या आता तेच काम त्यांच्या या नवीन कार्यालयातून चालू असणार आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच आपल्या वडिलांप्रमाणे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांच्या वरळी मधील ऑफीसमधील +९१ २२२४९००९९३ हा जुना नंबर पुन्हा पंकजा मुंडे यांच्या कडून चालू करण्यात आला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा