मुंबई : गौरी लंकेश हत्याप्रकरणी मुख्य आरोप ऋषिकेश देवडीकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ऋषिकेश हा मूळचा औरंगाबाद येथील रहिवासी आहे. ऋषिकेश देवडीकरला विशेष तपास पथकाने (एसआयटी) झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील कतरास येथून बेड्या ठोकल्या आहेत.
ऋषिकेश गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. ऋषिकेश देवडीकरला शुक्रवारी (दि.९) रोजी धनबादमधील कोर्टात हजर करण्यात येणार असून येणार असून कोठडी घेतल्यानंतर बेंगळुरूत आणून त्याची अधिक चौकशी केली जाणार आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येच्या कटातील प्रमुख आरोपी ऋषिकेश गेल्या काही दिवसांपासून झारखंडमधील धनबादमध्ये ओळख बदलून राहत होता, याची माहिती एसआयटीला मिळाली. त्याआधारे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कतरास येथे छापा टाकून त्याला बेड्या ठोकल्या.
दि.५ सप्टेंबर २०१७ मध्ये गौरी लंकेश यांची त्यांच्या पश्चिम बंगळुरूतील घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. तीन हल्लेखोरांनी गौरी लंकेश यांच्या घरात घुसून त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात गौरी यांचा जागीच मृत्यू झाला होता.















































