देशविरोधी कंटेंटवर सरकारची कारवाई, 16 यूट्यूब चॅनल ब्लॉक, 6 पाकिस्तानी चॅनल्सवरही बंदी

नवी दिल्ली, 26 एप्रिल 2022: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार प्रसार करण्यासाठी 16 YouTube न्यूज चॅनेल ब्लॉक केले आहेत. यातील 10 चॅनल भारतीय आणि 6 पाकिस्तान आधारित यूट्यूब चॅनेल आहेत. IT नियम, 2021 अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून त्यांना ब्लॉक केलंय.

मंत्रालयाचे म्हणणे आहे की हे सर्व YouTube चॅनेल दहशत निर्माण करण्यासाठी, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि भारतातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासाठी खोटी, असत्यापित माहिती पसरवत होते. ब्लॉक YouTube न्यूज चॅनेलचे 68 कोटीहून अधिक दर्शक होते.

एका ठराविक समुदायाला आतंगवादी दर्शवण्यात आलं

सरकारने म्हटलंय की कोणत्याही डिजिटल वृत्त प्रकाशकाने IT नियम 2021 च्या नियम 18 अंतर्गत आवश्यक माहिती मंत्रालयाला दिली नाही. मंत्रालयाने सांगितलं की, भारतातील काही यूट्यूब चॅनेलने प्रकाशित केलेल्या कंटेंट मध्ये एका समुदायाला दहशतवादी म्हणून दाखवण्यात आलंय. याशिवाय, विविध धार्मिक समुदायांच्या सदस्यांमध्ये द्वेषाला प्रोत्साहन देण्यात आलं. अशा प्रकारचं कंटेंट तयार करून जातीय तेढ निर्माण करून सार्वजनिक व्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होता.

भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर आणि भारताचे परराष्ट्र संबंध अशा विविध विषयांवर भारताविषयी खोट्या बातम्या पोस्ट करण्यासाठी पाकिस्तानमधील यूट्यूब चॅनेलचा वापर केला जात होता.

केली आहे आधीच कारवाई

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही पहिली घटना नसून देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचं कारण देत सरकारने यादरम्यान आणखी अनेक यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. अलीकडं, मंत्रालयाने, IT नियम 2021 अंतर्गत आणीबाणीच्या शक्तीचा वापर करून, 22 YouTube चॅनेल, तीन ट्विटर अकाउंट, एक फेसबुक अकाउंट आणि एक न्यूज वेबसाइट ब्लॉक केली. ही खाती आणि चॅनेल्स सोशल मीडियावर संवेदनशील आणि खोटी माहिती पसरवण्यासाठी आणि भारताची सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित खोट्या बातम्या पसरवण्यासाठी वापरण्यात येत होते. ब्लॉक केलेल्या YouTube चॅनेलची एकूण 260 कोटी व्ह्यूअरशिप होती.

2021 मध्येही सरकारने देशाविरुद्ध पाकिस्तानी प्रचार मोहिमेवर मोठी कारवाई केली होती. देशाविरुद्ध अपप्रचार करणाऱ्या 20 यूट्यूब चॅनेलला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्लॉक केलंय.

मंत्रालयाने आपल्या स्वतंत्र आदेशात यूट्यूबला 20 चॅनेलवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. गुप्तचर संस्था आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्यातील समन्वयाच्या प्रयत्नानंतर ही कारवाई करण्यात आली. देशात ब्लॉक करण्यात आलेले YouTube चॅनेल आणि वेबसाइट्स पाकिस्तानबाहेर कार्यरत असलेल्या नियोजित प्रचार नेटवर्कशी संबंधित होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा