नागपूर, १५ मार्च २०२४ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासना द्वारा नागपूर मधील ‘रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र : (लेडिज अँड जेंटेस) ला ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण’ पुरस्कार घोषित झाला असून मुंबई हा पुरस्कार दिला गेला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाचे पदाधिकारी, मा. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन, मा. अजित पवार, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला गेला. हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा १२ मार्च रोजी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, जमशेद भाभा नाट्यगृह, नरिमन पॉईंट, मुंबई येथे संपन्न झाला.
समाजासाठी केलेल्या महाराष्ट्रभर व्यसनमुक्ती आणि जनजागृती या सेवा कार्याबद्दल रिफ्रेश व्यसनमुक्ती केंद्राला हा पुरस्कार मिळाला. याचा स्विकार केंद्राच्या वतीने संस्थापक तथा सचिव सुरेश वांढरे आणि संचालिका प्रांजली वांढरे (ताल्हण) यांनी स्वीकारला.
या पुरस्काराने समाजसेवेचे हे कार्य अजून स्पूर्तीने करण्याची प्रेरणा सर्व कर्मचाऱ्यांना मिळाली. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले गेले असून या यशाबद्दल संपुर्ण समजातर्फे केंद्राच्या उत्कृष्ठ कामाचे कौतुक होत आहे. तसेच अनेक मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव देखील होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे