काष्टी,८ मे २०२०: सध्या संपुर्ण देशामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड ते दोन महिन्यापासून बंद पाहण्यास मिळतं आहे. त्यामुळे नाभिक व्यवसाय अजूनही बंदच ठेवण्यात यावे, हा आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे.
नाभिक समाज अत्यंत गरीब असून त्यामुळे कारागीर व सलून मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडलेले असून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत त्यांना राज्य सरकार कडून मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
याबाबत रंधवे यांनी कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या पाच हजार रुपये प्रत्येकी यांचा दाखला देत महाराष्ट्र सरकारने असाच निर्णय घेऊन समाजाला न्याय द्यावा अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे, अशी माहिती अहमदनगर प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र नाभिक महामंडळ महाराष्ट्र राज्य व युवक जिल्हाध्यक्ष नाभिक महामंडळाचे अध्यक्ष पै.अजय रंधवे यांनी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष
पुणे से यूपी गोरखपुर जाने का
रंधावे साहेबांचे बरोबर आहे .की नाभिक समाज हा समाजातील ऐक मूलभूत घटक आसुन समाची ऐक प्रकारे सेवा करत असतात .पण त्यांचे जीवां मन हे सलून वेवसायातून चालत असून .आज जगभर पसरलेल्या कोरोना वयरास मुळे आज हा नाभिक समाज आडचानित आसून त्यांचा वेवसाय सलोन बंद आसल्या मुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाला आहे आणि त्या मुळे त्यांच्या वर उपाशी पोटी झोपण्याची वेळ आली आहे तरी .वरील रंधवे साहेबांच्या विचारास मी सहमत असून प्रशासन आणि शासनाने त्यावरती सखोल विचार करून नाभिक समाजाला मदतीचा न्याय मिळवून द्यावा ही विनंती व नाभिक समाजाला आर्थिक मदत लवकरात लवकर मिळून द्यावी ही विनंती .