संरक्षण मंत्रालयाच्या आर्मी ऑर्डिनन्स डेपो युनिट्समध्ये सरकारी नोकर भरती

नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर २०२२ : सरकारी अधिसूचनेनुसार, ऑर्डिनन्स डेपो आणि युनिट्समध्ये, मटेरियल असिस्टंटच्या एकूण ४१९ जागांसाठी भरती होणार आहे.

रिक्त जागांचा तपशील पुढील प्रमाणे-

मध्य पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड – १८५ पदे. उत्तर जम्मू आणि काश्मीर, लडाख – २३ पदे. पूर्व आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर – १० पदे. मध्य पूर्व पश्चिम बंगाल, झारखंड, सिक्कीम – २६ पदे. पश्चिम दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा – १२० पदे. दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू – ३२ पदे. दक्षिण पश्चिम राजस्थान, गुजरात – २३ पदे.

इच्छुक उमेदवारांना पात्रता ही, कोणत्याही शाखेच्या पदवी किंवा मटेरिअल मॅनेजमेंट किंवा अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा आवश्यक आहे. तसेच उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २७ वर्षे असावे. SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत ५ वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट मिळेल. या पदासाठी पात्रतेनुसार पगार- रु.२९२००/- ते रु.९२३०० एवढा राहील.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज www.aocrecruitment.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांपर्यंत करता येतील. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आर्मी ऑर्डिनन्स डेपो आणि युनिट्समध्ये मटेरिअल असिस्टंट पदासाठी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा आवश्यक आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा