नवी दिल्ली, १६ ऑगस्ट २०२२: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या प्रा. अनिता बोस फाफ यांनी भारत सरकारला एक हृदयस्पर्शी आवाहन केल आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अवशेष जपानमधून भारतात परत आणण्याची विनंती त्यांनी सरकारला केली. अनिता म्हणाल्या की, स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख नायक म्हणजे सुभाषचंद्र बोस. मात्र, ते अद्याप मायदेशी परतलेले नाहीत. अशा परिस्थितीत त्यांनी सरकारकडं अशी इच्छा व्यक्त केली की त्यांचे अवशेष भारतात आणले जावेत
अनिता म्हणाल्या की इंडियन नॅशनल आर्मी (INA) आणि त्यांचे साथीदार त्यांना प्रेमाने आणि आदराने नेताजींच्या नावाने हाक मारतात. आयुष्यभर ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले. या संघर्षासाठी त्यांनी खूप बलिदान दिलं – ज्यामध्ये त्यांची मनःशांती, कौटुंबिक जीवन, त्यांची कारकीर्द आणि शेवटी त्यांचं जीवन समाविष्ट होतं.
त्यांच्या समर्पण आणि बलिदानाबद्दल देशवासियांना आजही प्रेम आहे. यामुळंच नेताजींची विविध ठिकाणी स्मारकं बांधण्यात आली आणि त्यांची स्मृती आजतागायत कायम आहे. नुकतंच दुसरं भव्य स्मारक बांधण्यात आलंय. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे त्याचं अनावरण करणार आहेत.
त्या पुढं म्हणाल्या की, नेताजींबद्दल एवढी नितांत आपुलकी आणि प्रेम आहे की आजही भारतातील लोक त्यांना फक्त स्मरणात ठेवत नाहीत, तर काही लोकांना आशा आहे की १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला नाही आणि एक दिवस ते त्यांच्या घरी परततील. पण आज आमच्याकडे १९४५ आणि १९४६ चा सविस्तर तपास अहवाल आहे. यावरून नेताजींचा त्या दिवशी परदेशात मृत्यू झाल्याचं दिसून येतं.
अनिता म्हणाल्या की, जपानने नेताजींचे अवशेष टोकियो येथील रेन्कोजी मंदिरात तात्पुरत्या ठिकाणी ठेवले आहेत. सांभाळ करणाऱ्यांच्या तीन पिढ्या इथं गेल्या. जपानी लोकांच्या मनातही आदर दिसतो. जपानच्या बहुतांश पंतप्रधानांसह अनेक भारतीयांनी नेताजींना आदरांजली वाहिली आहे.
आता आधुनिक तंत्रज्ञानात डीएनए चाचणी केली जात आहे. अवशेषांमधून डीएनए काढता येतो. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा मृत्यू झाला नाही अशी शंका ज्यांना वाटते त्यांच्यासाठी हा वैज्ञानिक पुरावा महत्त्वाचा ठरेल. टोकियोच्या रेन्कोजी मंदिरात ठेवलेले अवशेष नेताजींचे नसावेत असा संशय सध्या लोकांना आहे.
नेताजींच्या मृत्यूच्या अंतिम अधिकृत भारतीय चौकशी अहवालात (न्यायमूर्ती मुखर्जी कमिशन ऑफ इन्क्वायरी) दर्शविल्याप्रमाणं रेनकोजी मंदिराचे पुजारी आणि जपानी सरकारने अशा चाचणीला सहमती दर्शवली असल्याचं त्या म्हणाल्या. चला तर मग शेवटी नेताजींना घरी आणण्याची तयारी करूया.
अनिता यांनी पत्रात असंही लिहिलं आहे की, नेताजींच्या आयुष्यात देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा महत्त्वाचं काहीही नव्हतं. परकीय राजवटीपासून मुक्त भारतात राहण्यापलिकडे त्यांना काहीही नको होतं. स्वातंत्र्याचा आनंद अनुभवण्यासाठी ते राहिले नसल्यामुळं किमान त्यांचे अवशेष भारतीय भूमीत परत करण्याची वेळ आलीय. नेताजींची एकुलती एक मुलगा या नात्याने मी हे सुनिश्चित करण्याचं आवाहन करत आहे की, त्यांची सर्वात प्रिय इच्छा स्वातंत्र्यात त्यांच्या देशात परतण्याची होती. अखेरीस ही इच्छा या स्वरूपात पूर्ण होईल आणि त्यांच्या सन्मानार्थ योग्य समारंभ आयोजित केले जातील.
त्या पुढं म्हणाल्या की, आज सर्व भारतीय, पाकिस्तानी आणि बांगलादेशी स्वातंत्र्यात जगू शकतात. माझे बंधू आणि भगिनी म्हणून मी तुम्हा सर्वांना सलाम करते आणि नेताजींना घरी आणण्याच्या माझ्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे