दापोली, २० ऑगस्ट २०२२: रत्नागिरी जिल्ह्यातील हर्ण पाच पंढरी गांवात कोळी समाजात दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पाच पंढरी गांवातील होमाआळी मंडळाने दहीहंडी उत्सवाची सकाळपासूनच तयारी केली होती.
पाच पंढरी गांवातील वसंत लाया चौगुले या गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने नाचता नाचता मृत्यू झाला आहे. दहीहंडी उत्सवात नाचत असताना अचानक या गोविंदाच्या छातीत कळ आली.
पाच पंढरी गांवातील होमा आळीतील वसंत लाया चौगुले मंडळाचे कार्यकर्ते होते. अधिक उपचारासाठी हलविण्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. या सर्व घटनांमुळे गोविंदांवर दुःखाचे सावट पसरले असून नाचताना हृदयविकाराने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: विजय सपकाळ