ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर २८ फेब्रुवारीला मोर्चा

चोपडा, जळगाव २५ फेब्रुवारी २०२४ : ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर २८ फेब्रुवारीला मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. याबाबतचे निवेदन देताना कर्मचाऱ्यांनी काही गोष्टी नमुद करत सांगीतले की, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने १६/१७ जानेवारी रोजी जळगाव येथे राज्यव्यापी आंदोलन केले होते. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या स्वीय सहाय्यक देशमुख यांनी, महाजन यांच्या कडून मंत्री महोदय मीटिंग घेतील असे आश्वासन दिले होते. पण ते आश्वासन मंत्री महाजन यांनी पाळले नाही तसेच महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्याचे पगार पूर्वीपेक्षा कमी देण्यात आले.

या गोष्टींमुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. यावेळी विविध मागण्या समोर करण्यात आल्या. माननीय अभय यावलकर समितीच्या शिफारसी मान्य करा, नवीन किमान वेतन परिपत्रक काढा, मागील मार्च दोन हजार अठरा ते ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या ५७ महिन्याचा फरक अदा करा, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी लागणारी उत्पन्न व वसुलीची अट रद्द करा, दहा टक्के आरक्षणाचा लाभ द्या, आकृतीबंध रद्द करा, भविष्य निर्वाह निधी खाते अद्यावत करा, दरवर्षी दहा टक्के आरक्षणाची भरती करा, शासन मान्य राहणीमान भत्ता शासनाच्या तिजोरी मधून मिळावा आदी मागण्यासाठी येत्या २८ फेब्रुवारी रोजी येथे जामनेर येथे मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सचिव कॉम्रेड अमृतराव महाजन, जळगाव तालुका सचिव मुरलीधर जाधव, पाचोरा तालुका सचिव निलेश पाटील, जळगाव तालुका जामनेर तालुका अध्यक्ष कौरव सिंग पाटील, उपाध्यक्ष ज्ञानदेव शिरसागर, पुरुषोत्तम पाटील, निवृत्ती डोळसे, देवानंद कोळी आदी प्रतिनिधींच्या सह्यांचे दहा पानी निवेदन महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन स्वीय सहाय्यक माऊली यांना तसेच जामनेर तहसीलदार जामनेर पंचायत समिती, जामनेर पोलीस स्टेशन यांना हे निवेदन सादर केले. त्यात जिल्ह्यातील कर्मचारी नामदार महाजन यांच्या कार्यालयावर मोर्चा काढतील असा इशारा दिलेला आहे. तरी मोर्चासाठी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी मार्केट कमिटी जामनेर या ठिकाणी २८ फेब्रुवारी बुधवारी रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष संतोष खरे, शिवशंकर महाजन, किशोरजी कंडारे, अमोल महाजन, नागेश नाईक, रतिलाल पाटील, अशोक जाधव, ओखा देवर, राजू पाटील, मधुकर जंगले, रतिराम राठोड, दिलीप इंगळे, अशोक गायकवाड, रमेश दिगंबर पाटील, राजेंद्र पाटील, मुकेश पावरा, सुभाष सोनवणे, शंकर दरी संजय कंडारे भास्कर सपकाळे पांडुरंग कोळी आदींनी केले आहे

न्युज अनकट प्रतिनीधी : आत्माराम पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा