चोपड्यात गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह पुण्यातील तिघांना अटक

चोपडा, जळगाव २५ फेब्रुवारी २०२४ : एका गुप्त माहितीच्या आधारे चोपडा ग्रामीण पोलीसांनी तीन गावठी कट्टे आणि जीवंत काडतुसांसह तिघांना मध्यरात्री अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत दि. २३ फेब्रुवारी रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास चोपड्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना एका गुप्त माहिती दाराकडून माहिती मिळाली की, सत्रासेन मार्गे एका राखाडी रंगाची गाडी क्रमांक (एम एच १२ आर.एफ.१४९६) या गाडीत तीन गावठी कट्टे घेऊन काही जण निघाले आहेत. यानंतर पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी तात्काळ रात्र गस्तीचे पोलीस हवालदार शशिकांत पारधी, वाहनचालक पोहेकॉ. किरण धनगर, होमगार्ड श्रावण तेली, होमगार्ड संजय चौधरी यांना सुचना दिल्या.

पोलीस हवालदार शशिकांत पारधी यांना सुचना मिळताच त्यांच्या पथकाने शिताफीने सापळा रचून बुधगाव फाट्याजवळ संशयीत कारला थांबविले. सदर गाडीची झाडाझडती घेतली असता, सदर गाडीत ३ गावठी कट्टे व ८ जिवंत काडतुसे मिळून आले. जफर रहिम शेख (वय ३३ वर्ष रा. संभाजी नगर घोड नदी शिरूर ता. शिरूर जिल्हा पुणे), तरबेज ताहिर शेख (वय २९ वर्ष रा. सेंटर दवाखाना समोर रिव्हेनी कॉलनी शिरूर ता. शिरूर जिल्हा पुणे), कलीम अब्दूल रहमान सैय्यद (वय ३४ वर्ष) अशी संशयितांनी आपली नांवे सांगीतली. चोपडा ग्रामीण पो. स्टे. सीसीटिएन गुरनं ३३/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन चोपडा न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : आत्माराम पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा