इंदापूर : ग्रामीण भागातील व्यापारी मंदीच्या सावटाखाली सापडला आहे. अजूनही व्यापारी या मंदीच्या सावटात मधून सावरला नसल्याने नक्की व्यवसाय कशा पद्धतीने करावा याच विचारात व्यापारी वर्ग चिंतेत दिसत आहे.
दिवाळी सणांमध्ये थोड्या फार प्रमाणात बाजारपेठेमध्ये उलढाल झाली. परंतु दरवर्षीप्रमाणे दिवाळीतही बाजारपेठ मध्ये उठाव दिसला नाही. दिवाळीनंतर मात्र ही परिस्थिती अजूनही गंभीर होऊन सध्या बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांच्या पुढे व्यवसाय कसा चालवावा हाच प्रश्न गंभीर स्वरूपात उभा राहिलेला आहे.
थोडाफार व्यवसाय चालतो, परंतु त्यातही जीएसटी आणि इतर व्यवसायाच्या अडचणी पाहता सध्यातरी व्यवसाय करून गाळा भाडे कामगारांचा पगार बिल व इतर लागणारा कच्चामाल या सर्वांचा ताळमेळ घालने व्यापारी वर्गाला कठीण जात असल्याने यातून कसा मार्ग निघेल याकडे व्यापारी वर्ग रोज नव्या आशेने पाहत आहे.
परंतु सध्याचा काळ पाहता व्यवसायावर मोठे मंदीचे सावट असल्याने यातून मार्ग निघेल हा प्रश्न व्यापार्यांच्या दृष्टीने फार गंभीर बनलेला आहे. यातून व्यापारी वर्गाला मार्ग काढण्यासाठी काय करावे हे सुचत नसल्याने व्यापारी वर्ग पुढील काळात व्यवसाय कसा करता येईल याच घडामोडीचा विचार करून येथील झालेला पाहावयास मिळत आहे.