नातीने आजी आजोबांना दिले खास सरप्राईज; व्हिडिओ व्हायरल

35

पुणे, ११ ऑक्टोबर २०२२: अनेकदा लोक त्यांच्या खास व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी अनेक नवीन मार्ग शोधतात. तसे पहायला गेले तर आजच्या काळात युवा पिढी प्रेमाची कबुली देतानाचे, एन्जॉय करताना आपले फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून, आपले प्रेम व्यक्त करीत असतात.

नुकताच एक क्यूट व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कोणी गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड नाही तर एक नात आपल्या आजोबांना असे सरप्राईज देताना दिसत आहे, जे पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

आजी-आजोबांचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सध्या सर्वांच्याच हृदयाला स्पर्श करत आहे. या व्हिडिओमध्ये नातीने आपले आजी आजोबांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाचा टॅटू आपल्या पायावर बनवून घेतला आहे. तो टॅटू बनवून तिने आपल्या आजी आजोबांना आश्चर्यचकित केले आहे. व्हिडिओतील आजी-आजोबांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे

व्हिडिओमधील आजी-आजोबा आणि नातवंडांमधील हे प्रेम सोशल मीडियावर पसंत केले जात आहे. या व्हिडिओमध्ये नातीच्या पायावर आपल्या नावाचा टॅटू पाहून आजोबा भावूक झालेले दिसत आहेत आणि त्या नंतर त्यांनी नातीला मिठी मारली आहे. आजोबा आणि नातीमधले हे प्रेम पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत तीन लाख वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे, तर १४९.७ हजार लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर १३.३ हजार वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हे त्याच्यासाठी खूप मौल्यवान क्षण आहेत.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘उत्तम.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘मी माझ्या आजोबांना मिस करत आहे.’

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.