नवी दिल्ली, 30 जानेवारी 2022: या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झालीय. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, या ट्रेडिंग आठवड्यात सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 878 रुपयांची घसरण नोंदवली गेली. त्याच वेळी, चांदीच्या दरात प्रतिकिलो 3,202 रुपयांची घसरण झाली. 24-28 जानेवारी 2022 च्या व्यावसायिक आठवड्यात, 26 जानेवारी (बुधवार) ही प्रजासत्ताक दिनाची सुट्टी होती आणि त्यामुळं स्पॉट मार्केटमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार झाला नाही.
सोन्याच्या किमतीत असे चढउतार
24 जानेवारी 2022: आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव 48,793 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
25 जानेवारी 2022: मंगळवारी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 68 रुपयांनी वाढून 48,861 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
27 जानेवारी 2022: गुरुवारी सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 333 रुपयांची घसरण दिसून आली. त्यामुळं 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48,528 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
28 जानेवारी 2022: शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 613 रुपयांनी घसरून 47,915 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
अशाप्रकारे, असं म्हणता येईल की 24 जानेवारी 2022 ते 28 जानेवारी 2022 दरम्यान, 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 878 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदवली गेली. यापूर्वी दोन आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली होती.
चांदीचे भावही नरमले
24 जानेवारी 2022: सोमवारी चांदीचा भाव 64,422 रुपये प्रति किलो होता.
25 जानेवारी 2022: आठवड्याच्या दुसऱ्या सत्रात चांदीच्या किमतीत प्रति किलो 710 रुपयांची घसरण दिसून आली. त्यामुळं स्पॉट मार्केटमध्ये चांदीचा भाव 63,712 रुपये प्रति किलोवर आला.
27 जानेवारी 2022: प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवसाच्या सुट्टीनंतर गुरुवारी बाजार उघडला तेव्हा चांदीच्या किमतीत 1,025 रुपयांची घसरण झाली. त्यामुळं चांदीचा भाव प्रतिकिलो 62,687 रुपयांवर आला.
28 जानेवारी 2022: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात चांदीचा भाव 1,467 रुपयांनी घसरून 61,220 रुपये प्रति किलो झाला.
अशा प्रकारे, 24 जानेवारी 2022 ते 28 जानेवारी 2022 दरम्यानच्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये चांदीच्या किमतीत प्रति किलो 3,202 रुपयांची घसरण नोंदवली गेली.
सोन्या-चांदीच्या किमतीकडं लागलं सर्वांचं लक्ष
भारतात सोन्याच्या दागिन्यांची मोठी क्रेझ आहे. लोक सोन्याची खरेदी शुभ मानतात आणि लग्नांमध्ये याला खूप मागणी असते. त्यामुळंच सोन्या-चांदीच्या दरात होणार्या चढ-उताराकडं सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे