कोरोना व्हायरसच्या भीतीने एसटीच्या फेऱ्यात मोठी घट

बारामती शहरातून पुण्याला जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एसटी गाडीला रोज मोठी गर्दी असते रोजच्या जवळपास शंभर पेक्षा जास्त होणाऱ्या एसटीच्या फेऱ्यांमध्ये मोठी घट झाली आहे.पुण्याकडे जाताना एसटी मध्ये खूप कमी प्रवासी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कोरोना व्हायरसचा नागरिकांनी चांगलाच धसका घेतला असुन व शासनाने गरज नसताना प्रवास करू नये व गर्दीची ठिकाणे टाळावी असे आवाहन केल्याने व पुण्यात कोरोनाचे रुग्ण सापडले अशा बातम्यांमुळे बारामतीहुन पुण्याकडे धावणाऱ्या एसटी मध्ये मोठी घट झाली असल्याचे आगर प्रमुख अमोल गोंजारी यांनी सांगितले पुण्याला शिवशाही गाडी रोज ४० फेऱ्या होत होत्या त्यापैकी २५ फेऱ्या रद्द झाल्या आहेत.तर सध्या लाल गाडीमध्ये देखील प्रवाश्यांचे पुण्याकडे जाण्याचे प्रमाण खुप घटले आहे.शाळा बंद असल्याने शाळेच्या गाडीच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत.तर मुंबई,कोल्हापूर,नगर सारख्या शहरांकडे जाणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द झाल्याने एसटी आगाराला मोठा आर्थिक फटका बसत आहे.
कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य असल्याने रोज एसटी गाड्या स्वच्छ धुतल्या जात असुन तर एसटी आगाराची दिवसातून चार वेळा स्वच्छता केली जात आहे.स्वच्छता गृहात देखील चार वेळा पावडर फवारणी केली जात आहे.गोंजारी यांनी सांगितले तर या कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी चालक व वाहक यांना एसटी आगराच्या वतीने मास्क दिले जाणार आहे. पुढील महिन्यात असणाऱ्या लग्न सराईच्या एसटी गाड्यांच्या बुकिंग मध्ये देखील मोठा फरक पडला असल्याचे गोंजारी यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा