“ग्रीन व्हॉल्ट” मधून ८० अब्ज रुपयांच्या हिऱ्यांची चोरी

16

अंतरराष्ट्रीय : जर्मनीच्या ड्रेस्डेन येथील राजकीय वस्तूसंग्रहालय ‘ग्रीन व्हॉल्ट’ मधून जवळजवळ ८० अब्ज रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या डायमंड ज्वेलरीचे सेट चोरीला गेले आहेत. सोमवारी पोलिस आणि संग्रहालय संचालकांनी ही माहिती दिली.
याबाबत जर्मन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दुसर्‍या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी चोरी आहे. हे संग्रहालय ड्रेस्डेनच्या राजवाड्यात आहे. इथे चार हजारांहून अधिक मौल्यवान दागिने व हस्तिदंती वस्तू, सोने, चांदी तशीच अनेक अमूल्य रत्ने आहेत. चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये 18 व्या शतकातील सॅक्सोनी शासक ऑगस्टस द स्ट्रॉन्गच्या संग्रहालयातील मोल्यावान हिऱ्यांचाही समावेश आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, सोमवारी पहाटे वीज पुरवठा खंडित झाला. चोरट्यांनी संग्रहालयात तोडले. यावेळी सर्वत्र अंधार होता. तसेच वीज नसल्यामुळे संग्रहालयात गजरही नव्हता. परंतु संपूर्ण संग्रहायालयावर पाळत ठेवणारा कॅमेरा कार्यरत होता. ज्यामध्ये दोन लोक खिडकी तोडून संग्रहालयात प्रवेश करताना दिसत आहेत.
२०१७ मध्ये बर्लिनमधील बोडे संग्रहालयात २४ कॅरेट १०० किलो सोन्याचे नाणे चोरीला गेले होते. या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध तर नाही ना या गोष्टीचाही पोलीस तपास करत आहेत. ( गुजरात येथे मुकबधिर असल्याचे नाटक करत भामट्याने पळवले 40 लाख रुपयांचे हिरे)

चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये १०० हून अधिक मौल्यवान दागिन्यांचा सानावेश आहे. सोमवारी सकाळी दोन जणांनी हे चोरी केली. यामध्ये एक अब्ज युरोपेक्षा जास्त प्राचीन दागिन्यांची चोरी झाली आहे.
उत्तरोत्तर इतिहासातील ही सर्वात मोठी कला चोरी असल्याचे सांगितले जात आहे. संग्रहालयात आग लागून चोरांनी राजवाड्यात प्रवेश केला आणि त्यानंतर वीजपुरवठा बंद करुन या दागिन्यांची चोरी केली. १७२३ मध्ये सॅक्सोनी शासक ऑगस्टस द स्ट्रॉन्ग यांनी ग्रीन व्हॉल्टची स्थापन केली होती. हे संग्रहालय यूरोपमधील सर्वात प्राचीन संग्रहालयापैकी एक म्हणून ओळखले जाते. इथे युरोप खंडातील सर्वात मोठा खजिना संग्रह आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा